"गणपती बाप्पा मोरया" "दुर्गा मात की जय" "दिन दिन दिवाळी,गायी म्हशी ओवाळी" अस सगळ करण्यात दोन अडीच महिने कसे निघून गेले ते कळलेच नाही, दुकानातील पाडवा पूजन केल, घरातील (साजूक तुपातील) फराळावर ताव मारला, घरच्यांसोबत गप्पा मारताना कसे कोण जाणे पण काकांनी माझ्या बोम्बलत हिंडण्याचा विषय काढला, आणी परत तेच नेहमीप्रमाने टोमणे सुरु झाले, कशाला हिंडतो, कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, आणी आता तुझ लग्न झालाय, वगैरे.... वगैरे..... त्याना सगळ पुरान परत समाजवून सांगितलं, ते त्यांचा हेका सोडत नव्हते आणी मी माझा मुद्दा, असो, आमची वादावादी काही संपेना, आजी ने मधेच इतर विषय काढून या वादावर तात्पुरता पडदा टाकला, आणी माझ्या डोक्यात किडा वळवळला,
गुलाबी थंडीची सुरुवात होताच होती, म्हंटल यंदा बागलाण भटकंतीचा श्री गणेशा करुया, म्हणून अनेक दिवसाची इच्छा असलेला साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा ही जोडगोळी मनोमन निश्चित केली, आणी DJ ला Whatsaap करून रिकामा झालो, त्याच्या रिप्लाय ची वाट बघत होते, रिप्लाय नाही पण संध्याकाळी DJ महाशय स्वत: हजर झाले, चेहऱ्यावरून अंदाज आला नाही, म्हंटल काय ते तोंडाने बोल, सलग सुट्ट्यांमुळे काही व्यावसायिक अडचणी होत्या, आणी नेहमीप्रमाणे इतर मंडळीनी टांग दिली होती, म्हणून हा जोडगोळी चा प्लान अर्धा - अर्धा करावा किंवा पुढे ढकलावा, अस मत आल, प्लान पुढे ढकलण शक्य नाही, हे एकमताने मंजुर केल आणी हा जोडगोळीचा प्लान आत्ता अर्धा करायचा ठरल, नेहमीप्रमाणे रात्री निघायच, निम्मेअधिक अंतर पार करुन विश्रांती घ्यायची आणि नव्या दमाने पुढील अंतर कापायचे असे निश्चीत झाले, आणि शुक्रवारी रात्री ११ वाजता गाडीला चावी दिली, कुडकुडनार्या थंडीत गाडी चालवणे हे मला नेहमीच मजेशीर वाटते, पण DJ ने काही गाडी माझ्या वाटयाला येवुन दिली नाही, साधारण दोन वाजण्याच्या सुमारास सिन्नर मध्ये आलो, क्षणभर विश्रांती साथी बस स्टॅंड वर गेलो, पण स्थानिक भिकार्यानी जवळ जवळ संपुर्ण बस स्टॅंड बुकिंग केलेल होत, म्हणुन इतर ठिकाण शोधण्यात वेळ घालविण्यापेक्षा नेहमीच ठिकाण बघितल आणि अंग टाकल ते पहाटे ५:३० पर्यंत, थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता, त्यात गाडी माझ्या हाती आली, मग नाशिक मार्गे काही तासातच गाडी सालवान गावात आली, प्रत्येक किमी नुसार लहान होणारी गावे लक्षात घेता इथेच पोटपुजा उरकावी म्हणून गाडी बाजूला घेतली, एक दोन हॉटेल मध्ये विचारपूस केली त्यातील एकाचे उत्तर, "कांदा भजी आहे, मिसळ कालच संपली" असो, तर इथेच कसाबसा नाश्त्याचा प्रश्न मार्गी लावला सोबतच पाण्याचा मजबुत साठा करुन घेतला, आणि गाडी वाघाम्बे कडे वळवली, गावात पोहोचल्यानंतर आम्ही काही बोलण्याच्या आधीच काही चाणाक्ष मंडळीनी ओळखल की आम्ही साल्हेर किल्ल्यावर जायला आलोय, त्यानी स्वत:हुन गाडी लावायची जागा दाखविली सोबत किल्ल्यावर जाणारी (मळलेली) वाटही दावली,
मंदिराला वळसा घालुन थोडे चालत गेल्यावर लगेच एक ओढा लागला, मजबुत थंडी असुन पण त्या गार पाण्याने हात- पाय धुवुन फ्रेश झालो, आणि किल्ल्याकडे मार्गस्थ झालो, अर्धातास चढण पर्यत गावातले कोण ना कोण सोबत होतच, त्यानंतर आम्ही दोघेच..... चालतोय, चालतोय, चालतोय पण खिंड काही येइना, दमलो बुवा म्हणत दगडावर बसकन मांडली, थोडा आढावा घेतला, किल्यावर जळनासाठी सरपण मिळनार नाही हे काही मित्रांकरवी ठावुक होत म्हणुन त्याचे तजविज जाता जाताच करावी लागणार होती, त्यानुसार हालचाल करायला सुरुवात केली, एका पिशवीत लहानसहान लाकडे, जणावरांच पडलेल (वाळलेल) शेण, अस काही गोष्टी गोळा करत करत पुढची वाटचाल चालु ठेवली, दुर सालोटा कडे नजर टाकली तर ५-६ माणसे दिसत होती, जरा बर वाटल, कोणीतरी सोबत असल्याच समाधान झाल, पण ते जास्त काळ टिकल नाही कारण ते एक गुजराथी कुटुंब होत जे काल किल्ल्यावर मुक्कामी होत आणि आज परतीच्या वाटेला लागल होत, मन पुन्हा एकाकी पडल, पण वाटचाल चालुच होती, वाटेत कोठेही म्हणावी अशी सावली नव्हती, खिंड जवळ येताना दिसत होती, आणी रस्ता खुपच निमुळता होत होता, पायातले ब्य्रांडेड बुट सुद्धा ग्रिप घेत नव्हते, जास्तीचा आगावुपणा नको म्हनुन पायतले बुट काढुण काही काळ तो रस्ता अनवानी पार केला, दमत भागत का होइना पण २ वाजता खिंड गाठलीच, सकाळची कांदाभजी संपुन पोटाची गाडी केंव्हाच रिझर्व ला लागली होती, दोन - तीन तासाच्या खड्या चढाई मुळे ह्रदय नावाच इंजिन पण धड- धड करत होत, पायातले बुट नावाचे टायर पण बऱ्यापैकी तापले होते, आणि खिंडीत गेल्यावर थोडी का होइना सावली मिळेल ही आशा सुद्धा सपशेल फेल गेली होती, खिंडीत कुठेही सावली दिसत नव्हती, त्यामुळे मानसिक थकवा जाणवायला लागला होता, कुठेतरी बसुन पोटापाण्याच्या प्रश्न सोडवायला हवा होता, त्यातच पुढच्या कोपऱ्यात ५ जणांचा गृप दिसला, त्यांची पोटपुजा उरकली होती, त्यानीपन बऱ्यापैकी सरपण गोळा केल होत, तोंड ओळख झाली ते पुढे मार्गस्थ झाले, आम्ही पोटोबाचा प्रश्न सोडवायला बसलो, बाकी अवयवाना पण थोडी विश्रांती दिली, पोटाचा कोठा पुर्ण करुन आम्हीपण त्यांच्या मागोमाग मार्गस्थ झालो, खिंडीतुन साल्हेर कडे मान वर करुन बघितल तरी पण त्याचा अवाका नजरेच्या टप्प्यात बसत नव्हता, खिंडीतुन जाताना साल्हेर ला उजवीकडे ठेवत सरळ पुढे जायच आणि काही अंतर चालत गेल्यावर "यु टर्ण" घेत पायऱ्या असलेल्या साल्हेर किल्ल्याकडे वळायच, वाट मळलेली असल्यामुळे चुकण्याचा प्रश्न येत नाही, पण पायऱ्या पूर्णपणे थकवुन सोडतात, एक एक पाय उचलत, हात टेकवत पहिल्या दरवाज्याच्या जवळ पोहोचलो,सकाळ पासून शोधात असलेली सावली भेटल्यामुळे एक प्रकारचे समाधान मिळाले, सोबतच बोनस म्हणुन गार वार्याचा झोत आला, शरीर सुखावल, मन टवटवीत झाल, थोडा आराम करून घरच्याना दाखविण्यासाठी काही पुरावे (फोटो) घेतले, आणि किल्ल्यावर मार्गस्थ झालो,
गडावर आल्यास डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न मंदिरांचे अवशेष आढळतात. पुढे थोडयाच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. पहिली उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यासमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. व हीच वाट आपल्याला पुढे सहा दरवाजे पार करून साल्हेरवाडीत उतरवते, तर मंदिरापासून वर चढत जाणारी दुसरी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. ही जागा मुकामासाठी योग्य आहे, इथे सर्व सामान उतरवून गंगासागर तलावात फ्रेश होण्यासाठी गेलो, तलावाच्या थंड पाण्याने हात-पाय धुतले, डोकं शांत केलं, एकदम ताज तवान झालो, आणी एक गंमत झाली, दृष्टीआड सृष्टी म्हणतात ना ते हेच ... एक कुटुंब किल्ला बघायला आलेलं, त्यांना या किल्ल्याबद्दल माहिती नसावी, त्यामुळे त्यांचा पाण्याचा साठा किल्ल्यावर येतानाच संपलेला, त्या कुटुंबात २-३ मुली होत्या, त्या पाण्यावाचून कासावीस होत होत्या, त्यांनी बरीच शोधाशोध करूनही त्यांना त्यांच्या मनासारखं पिण्याचं पाणी मिळालं नव्हतं, वैतागून त्या गंगासागर तलावाजवळ आल्या, कुटुंबप्रमुखाने आम्हाला पिण्याच्या पाण्याबद्दल विचारलं, मी त्यांना गंगासागर तलावाजवळच्या दोन टाक्याकडे बोट दाखवलं, त्या मुली पळतच गेल्या, पण ते पाणी बघून त्यांनी नाक मुरडत आमच्याकडे एक वेगळाच कटाक्ष टाकत बाजुला झाल्या, मग मीच त्यांना माझ्या सॅक मधली पाण्याची बॉटल दिली, त्यांनी हे बिसलेरी आहे का असं विचारलं, मी ही मनातल्या मनात हसत मान डोलावत हो म्हणालो, त्यांनी माझ्या दोन्ही बाटल्या रिकाम्या करून दिल्या, आणी थँक्स म्हणत सगळं कुटुंब मार्गस्थ झालं, पण गंमत अशी की, काही वेळापूर्वीच मी त्या दोन्ही बाटल्या त्याच गंगासागर तलावाच्या शेजारील टाक्यातुन भरून घेतलेल्या ज्या तलावाला त्या मुलींनी नाक मुरडली होती, नंतर बराच वेळ मी आणि DJ हसत होतो,
असो तर आम्ही पुन्हा गुहेत जाऊन चांगली दोन तास झोप काढली, साधारण ५ च्या आसपास जाग आली, तोपर्यंत इतर ग्रुप ची मंडळी चक्क आंघोळ करून आलेली, व इतर काही पब्लीक परतीच्या प्रवासास लागलेलं, ते सर्व बघत आपली बॅग घेतली तीन गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतले आणी गंगासागर तलावाजवळ आलो, काही आधीच्या ट्रेकर मंडळींनी चूल करून ठेवलेली, त्यामुळे छोटा संसार मांडला कडक कॉफी केली व डिनरची तयारी चालू केली, सोबतच उद्याच नियोजन करत होतो, "सालोटा" कसा, कुठून याचा अंदाज घेत होतो, तितक्यात १२-१५ वयोगटातील ५-६ मुले दिसली, त्यांना जवळ बोलावुन कुठले, काय, कसे याची थोडी चौकशी केली, आणि त्यातील दोघांना उद्या सकाळी ९ वाजता खिंडीत भेटायचं व आम्हाला सालोटा वर घेऊन जायचं मान्य केलं, योग्य मानधनामुळे ती मूलपण खुश झाली, त्यांना मार्गस्थ करून आम्ही मस्त मसाले भात, मसाला पापड आणी इत्तर गोष्टीची मेजवानी करून ९ वाजता पुन्हा गुहेत आलो, सकाळी किल्ला चढताना भेटलेला ग्रुप आपले सगळे सामान अस्थव्यस्थ पसरून "मिक्स भाजी व भात" ची मेजवानी बनवत होता, त्यांनी गुहेतच केलेल्या चुलीमुळे संपूर्ण गुहा धुराने माखलेली होती, काही काळ आम्ही बाहेरच बसलो, त्यांना सोबत घेऊन गुहेच्या तोंडाशी शेकोटी केली, त्या ग्रुप चा म्होरक्या सोडला तर इतर सर्व मंडळी आमच्या सोबत शेकोटी भोवती गोलाकार बसली, म्हंटल रात्री मस्त गप्पा टप्पा होतील, पण थोड्याच वेळात त्यांचा रंग दिसू लागला, त्यांनी सोबत रंगीबेरंगी बाटल्या आणलेल्या होत्या, माझी आणी DJ ची नजरानजर झाली आणी आम्ही झोप आली म्हणून तिथून सटकलो आणि गपचुप गुहेत जाऊन अंथरुणावर पडलो, ते ७-८ जण होते, त्यांना बोलून काही फायदा नव्हता, तासाभरातच त्यांचं जेवण उरकून रंगीत पार्टी चालू झाली ते थेट रात्री २ वाजेपर्यंत, आम्ही कानात हेडफोन टाकले आणि जुनी गाणी, गझल ऐकत झोपेच्या अधीन झालो,
सकाळी ५ ला जागे होऊन गुहेच्या बाहेर आलो, गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडमाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग आहे. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा - सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगीतुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.पहाटेच्या घुक्यातली मजा अनुभवली, काही फोटोबिटो काढले आणि सालोटा ला जायचं म्हणून लवकरच गुहेजवळ आलो, सॅक उचलल्या आणि पुन्हा गंगासागर तलावाजवळ येऊन थोडा नाश्ता केला,

(क्रमश:)....