Game

असा कसा मी.... वेगळा, वेगळा

Thursday, 10 November 2016

कसा मी .... असा मी

काहीसा खोडकर, पण बऱ्यापैकी शांत, तसा आतुन चिडखोर, पण वरुन एकदम संय्यमी एखाद्या ध्यानस्थ मुद्रा मध्ये असल्यासारखा, या पृथ्वी नावाच्या ग्रहाच व त्यावरील मनुष्य जातीच ना घेण - ना देण, आपन भल आणी आपल भल असा काहीसा, स्वत:च्या जगात मश्गुल होणारा (असणारा), असा मी म्हणजेच राहुल ......
      दिसायला पप्पांसारखा, स्वभावाला मम्मीसारखा, समाजात मिसळुन पण एकटा पडलेला, अगदीच लहानपणापासून आलेले - भेटलेले अनुभवांचे गारुड नकळत मनावर बिंबवले गेलेत, त्याचा कवडसा स्वभावावर पण जाणवतो.
        नशिबाच्या खेळामुळे, आज कंप्युटर ची बाराखडी गिरावतो, लोकांना डिजिटल युगात वावरायला मदत करतो, बऱ्यापैकी छान फोटो काढतो, घरच्यांशी भांडून वेळ काढून गडकिल्ले फिरतो,