रोजच्या रहाटगाडग्याने पिंजुन निघालेला माणुस एकदा का इरेला पेटला कि कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यातुन बाहेर पडतो, आणि स्वत:च्या जगात, स्वातंत्र्य अनुभवयास निघतो ना ....... बस...... तसच काहीतरी झाल.
काहीही प्लॅन न करता गाडीला चावी लावली, आणि रस्ता मिळेल तिकडे हॅंडेल फिरवु लागलो, पहाटेच्या मंद पण बोचणार्या थंडीत बाहेरुनच प्रती बालाजीच दर्शन घेतल आणि ५ मिनिटांत NH-4 ला लागलो, गाडी साताऱ्याकडे आगेकुच करीत होती, मी मागे बसुन गुगल मॅप धुंडाळीत होतोच, तेवढ्यात मॅप वाली बाई बोल्ली, on 400 mtr, plz right tern to Bhor road, streat drive to 12 km. बस्स आम्हाला तेच पाहीजे होत, रोहीडा किल्ला फक्त १६ किमी होता, घड्याळात बघीतल, पहाटेचे ५:१६ झालेले, DJ ला बोल्लो, भाई तु गाडी भगा, अपनेको " सूर्योदय" किल्ले पे जाकेच देखणेका, मग काय, खड्ड्या खुड्ड्यातुन गाडी आदळत आपटत, भोर मार्गे रोहीडा गाठलाच, पायथ्याला पोहोचल्यावर धुक्यामुळे नक्की किल्ला कुठे आहे हे काही उमजेना, त्यातच ५-१० मिनिटे गेली, किल्यावरचा सूर्योदय बघायला मन आतुर झालेल, पण किल्ल्याची दिशा कळेना, लांबुनच एक काका येताना दिसले, रस्त्यावर मधोमध थांबुन त्याना अडचण सांगितली, त्यांनीपण वेळ न दवडता रस्ता दावलाच, शेजारील प्राथमिक + माध्यमिक शाळेच्या पटांगणात गाडी लावा, आणि शाळेच्या पाण्याच्या टाकीला लागुन असलेल्या, मळलेल्या पायवाटेने सरळ जावा, तासाभरात तुम्ही गोरक्षनाथ मंदिर समोर पोहचाल, तोच किल्ल्याचा माथा, मी धन्यवाद काका म्हणेपर्यंत DJ ने गाडी पार्किंग केलीसुद्धा, मीच मागे होतो, मीही मग पटापट पाउले उचलत DJ च्या मागे निघालो, २० एक मिनिटांत आम्ही निम्मा रस्ता तर पार केला, पण नेहमीप्रमाने पहिल्या किल्ल्याच्या चढाईचा त्रास होतो तो झालाच, थोडी विश्रांती घेवुन पुढचा रस्ता पकडला, निम्यातुन चढण अंगावर असल्याने अपेक्षीत वेग मंदावला, त्यातच मला मागुन एक व्यक्ती किल्ला चढताना दिसत होती, बऱ्यापैकी धुके असल्यामुळे कोन ते स्पष्ट होत नव्हत, पण त्या व्यक्तीच्या चालण्याच्या वेग बघता ती कोणी ट्रेकर नसुन पायथ्याशी असलेल्या गावातीलच कोणी असावी असा अंदाज बांधला, मी थोडा सावकाश चालू लागलो, २-३ मिनिटांतच ती व्यक्ती नजरेच्या टप्प्यात आली आणि माझा अंदाज खर ठरला, साधी नाइट पॅंट आणि कुठल्यातरी राजकीय पक्षाचा मळलेला टि-शर्ट घातलेला २०-२५ च्या दरम्यानचा एक युवक, जवळ येताच त्यानेच स्वत:हुन विचारपूस चालु केली, कोण, कुठले, कसे आलात, कुठुन आलात अश्या प्राथमिक चौकश्या करुन झाल्या, व त्याने स्वत: बद्दल सांगण्यास सुरुवात केली, "म्या चंद्रकांत, हितच पायथ्याला रहातो, किल्ल्याच काम चालु आहे, काल गडबडीत लहान कुलुप लावलय, आता जावुन मोठ कुलुप लावायचय," आम्ही म्हंटलं का बर सध्या काम बंद आहे का ? नाय काम चालुच आहे, पण आज आमच्या कड गणपतीच इसर्जण आहे, म्हणून आज्च्याला काम बंद ..... मनात एक प्रश्न आला, याच्या घरच्या गणपतीच विसर्जण म्हनुन बाकीचे लोक का येणार नाही कामावर, एक गाव एक गणपती म्हनाव तर येतानाच दोन - तीन सार्वजनिक मंडळ दिसलेली, आणि आता तर पाच - सहा ठिकाणावरुन झिंगाट नायतर शांताबाई ऐकु येतीये, कोड सुटेना, म्हनुन चंद्रकांतलाच याच उत्तर विचारल, त्याला जरा हसु आलच, ते आवरत तो बोल्ला, पाव्हणं कस हाय, आमच्याकड गणपती लई बसत्यात, पण काही वर्षापासून आमच्या सरपंचान एक भारी पध्दत सुरु केलीया, सगळ्या गणपतीच इसर्जण एकाच दिवशी एकाच वेळेला आण एकाच लायणीत करयच, चंद्रकांत ने उत्तर दिल खर पण पुन्हा नवीन प्रश्न .. यात नवीन काय आहे, आपल्याकडे पण असच असत कि, शेवटच्या दिवशी मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती पासुन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पर्यंत एकाच दिवशी एकाच लायनीत होत की हे सगळ, हा विचार करे पर्यंत किल्याच्या महाद्वार पर्यंत आलो सुद्धा, या प्रवेशद्वार वर गणेशपट्टी व महिराब आहे, दोनच मिनिटे थांबलो, आणि अपेक्षीत असे सुर्यनारायण दिसले, त्यांच ते पहाटेच्या दवामधल तांबड लोभस रुप पाहत तिथेच उभे राहिलो, त्यानीपण आमच्या अंगावर कोवळी सोनेरी किरणे टाकुन आमच्यावर लक्ष आहे हे दाखवुन दिले, मन प्रसन्न झाल, "यासाठीच केला होता हा अट्टाहास" अस DJ काहीतरी पुटपुटला, तोपर्यंत चंद्रकांत ने महादरवाजा ची कडी उघडली आणि आम्ही आत गेलो, एकात एक असे तीन भक्कम दरवाजे असणारा हा किल्ला, सर्व दरवाजे व त्याच्या जवळची अजुनही भक्कम असलेली तटबंदी पाहुन किल्ल्याबद्दलची उत्सुकता अजुनच ताणली गेली, दुसऱ्या दरवाज्याच्या आत एक मोठ पाण्याच टाक आहे, यातील पाणी बाराही महीने पुरते, ते बघुन काही पायऱ्या चढुन गेलो, आत जाताच डाव्या बाजुला थोडस चालत गेलो, समोरच गोरक्षनाथ महाराज चे मंदिर दिसले, मंदिराचे दगडी बांधकाम असुन बाहेरील बाजुने पत्र्याचे शेड आहे, त्याच मंदिराला कुलुप लावण्यासाठी चंद्रकांत आलेला, त्याने लहान कुलुप काढले, आणि म्हनाला तुम्ही दर्शन घ्या मगच मी मोठ कुलुप लावुन खाली जातो, आम्ही मंदिरातलच तेल आणि वात वापरुन दिवा लावला, महाराजाना वंदन केल, मंदिरातील इतर वस्तु बघत होतो, एका बाजुला किल्ल्याच्या डागडुजीसाठी लागणार साहित्य होत, तर दुसऱ्या बाजुला महाराजांची पालखी व इतर मंदिराच साहित्य होत, गोरक्षनाथ महाराजांच्या फोटो शेजारी लाकडातील एक सुबक अशी गणेश मुर्ती होती, ती न्याहाळत असतानाच चंद्रकांत ने छोटी पिशवी माझ्या हातावर ठेवली, तीच्या आकारमानवरुन वजनाच्या अंदाजापेक्षा वजन जरा जास्तच होत, उत्सुक्तेपोटी पिशवी उघडली, त्यात काही जुनी नाणी व इतर काही वस्तु होत्या, एक एक करत सर्व वस्तुबद्दलची माहीती चंद्रकांत ने दिली त्या पिशवीत मुस्लीम राजवटी पासुन ते मराठ्याच्या अगदी शेवटच्या काळात वापरात आलेली सर्व नाणी होती, सोबतच किल्ला बांधणी करताना वापरण्यात येणारे शिसे चा तुकडा होता, (हे मी पहिल्यांदाच बघीतले) तसेच अगदी सुरुवातीच्या काळातला एक तोफेचा गोळा होता, आकाराने सफरचंद एव्हधा असला तरी वजणाला चांगलाच होता, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळातल्या बंदुकीच्या गोळ्या होत्या त्याही आकारमाना प्रमाणे वजनाला जडच होत्या, अश्या नानाविध वस्तु बघुन काहीकाळ भूतकाळात गेल्यासारखे भासले, हे सर्व बघुन मंदिरच्या बाहेर पडलो, चंद्रकांत ने कुलुप लावत लावत किल्ल्याबद्दलची सर्व माहीती दिली, व तो आल्या वाटेने परतीच्या प्रवासास मार्गस्थ झाला, किल्ला बघुन खाली येताना मुख्य प्रवेशद्वार आठवणीने लावुन या अस बजावुन गेला, (त्याच्या बोलण्यात राजे विषयीचा आदर व किल्ल्याबद्दलच प्रेम जाणवल) क्रमश ....